माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत कोविड-19 टाळण्यासाठी रांगोळीतून दिला अनमोल संदेश

kultabad-rangoli-compitation

महिला व मुलींनी रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून केली जनजागृती

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेत कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिज्ञा, मास्क वाटप , रिक्षावाले फेरीवाले भाजी विक्रेता फळ विक्रेता यांना स्वच्छतेसाठी साबण वाटप, मान्यवरांचे आभासी व्याख्यान, लोककलावंतांच्या माध्यमातून जनजागृती असे विविध उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजना खाली राबवून जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून गंगापूर तालुक्यात ममदापूर या ठिकाणी घरो घरी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

 

 


या रांगोळी स्पर्धेत महिला व मुलींनी विशेष उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून कोरोना टाळण्याबाबत आपल्या कलागुणांना वाव देत सुंदर आणि सुबक रांगोळी काढून जनजागृती केली. प्रत्येक रांगोळीच्या माध्यमातून कोरोना टाळण्यातबाबत स्वतःची काळजी घेण्याबाबत एक महत्त्वाचा संदेश दिसून येत होता.

 

 


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी स्वत: घरोघरी जाऊन रांगोळीची पाहणी केली व रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे विशेष कौतुकही केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भाऊ सांगळे , अविनाश पाटिल तालुकाप्रमुख सुभाष कानडे, आबा सिरसाठ , नगरसेवक भागेश्य गंगवाल, प्रकाश जैस्वाल , कैलास साबणे , प्रविण वालतुरे , मधुकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक आदी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here