शिवसेनेचे विकासकामे सर्वसामान्यापर्यंत पोहचवा – चंद्रकांत खैरे
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे प्रामाणिकपणे काम करत आहे. मात्र विरोधक त्यांच्या योजनामध्ये अडथळा आणण्याचे काम करत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेची विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा,असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. शिवसेना फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
शेतकरी कर्जमाफीसारखा ऐतेहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. कोरोनानंतर राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाची लवकरच मदत मिळणार आहे. फुलंब्री मतदारसंघ हा लोकसभा व विधानसभेला नेहमी भाजपकडे असायचा, त्यामुळे त्यांनी कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
या बैठकीस शिवसेना सहसंपर्कप्रमुख माजी महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, मा. महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विधानसभा संघटक राजू वैद्य, शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, माजी महापौर सुमनबाई कोल्हे, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, युवासेना शहर अधिकरी सतीश पवार, महिला आघाडीच्या शहर संघटक दुर्गा भाटी, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विष्णू गुंठाल, भाऊसाहेब राते, लक्ष्मण पिवळ, सचिन वाघ, सोमनाथ नवपुते, संतोष लिंबेकर, रुपेश मालानी, पंकज भावे, वल्लभ भंडारी, पंडित आंबेकर, संजय कोरडे, मनोज वाघमारे, विजय पाटील, संतोष वाघ, दत्तू देहडराय, सतीश काळे, महिला आघाडीच्या भागूबाई शिरसाठ, रेखा शाह, लता पवार, गौराबाई जाटवे, मीना खोतकर, रंजना रामटेके, बबिता गायकवाड आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.







