खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोनामुळे राज्य सरकारने सामूदायिक सण व उत्सवावर बंधने घातली आहे.त्यामुळे गौरी-गणपतीनिमित्त मूर्तीकारांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.यासोबतच गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही देवीच्या मूर्ति देखील विकल्या गेल्या नाहीत.म्हणून मूर्तिकारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेने रविवारी ता.18 रोजी केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे की,राज्य सरकारने राज्यातील हॉटेल,बार,रेस्टोरेंटला रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.मात्र कोणतेही उत्स्व साजरा करण्यास बंधने घातली आहेत.आम्ही राज्य सरकारकडे गणेशोत्स्व व नवतारत्रोत्सव निमित्त मंडळांना परवानगी देण्यात आली नाही.मात्र ती परवानगी देण्यात आली नाही.त्यामुळे आम्ही तयार केलेल्या मूर्ती विकल्या नाहीत.यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.आम्ही जगायच तरी कसं ,असा सवाल उपस्थित करत नुकसान भरपाई द्यावी.
या प्रसंगी जिल्हा परिषद मैदानावर उरलेले देविच्या मुर्ती ची पहाणी करतानां कुंभार समाज महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष मा.संजयभाऊ जोरले.कुंभार समाजाचे मुर्तीकार बांधवांच्या नवरात्री उत्सवात हाती आली निराशा राज्य सरकाला वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा घेतली बघ्याची भुमिका संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील उरलेल्या मुर्ती चे पंचनामे करुन करावी आर्थिक मदत नाहीतर सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असा तीव्र इशारा संजयभाऊ जोरले युवा प्रदेशाध्यक्ष यांनी पत्रकारांशी संवाद साधतानां दिला सरकारला इशारा.
यावेळी कीशोर गोरखोदे,सतिश गोडबोले, अविनाश भांगे,चंदु पेंढारकर, अशोक पेंढारकर, सतिश बगळे,मनोज कस्तुरे, पुथ्विराज चव्हाण,मुन्ना सांगळे, गणेश बगळे, रमेश बगळे, अमोळ जवळकर, किशोर बनचरे, दिनेश गोडबोले आदिंसह बरेच मुर्तीकार बांधवांची उपस्थिती होती.







