धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – एरंडोल तालुका शेतकरी सह संघ अध्यक्षपदाची निवडणूक आज रोजी पार पडली त्यात काँग्रेसचे निळकंठ शंकर पाटील (आप्पा )बाबुळगाव यांची सर्वपक्षीय एकमताने निवड करण्यात आली.
त्यानिमित्ताने काँग्रेसतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव डी जी पाटील, तालुकाध्यक्ष रतिलालनाना चौधरी, उपाध्यक्ष चंदन पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र न्हाळदे सरचिटणीस जगदीश चव्हाण महेश पवार आदी उपस्थित होते







