आमदार महेंद्र शेठ दळवी यांची २३ ऑक्टोबर २०२० रोजी करणार तुला

शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळ हेमनगरतर्फे होणार तुला

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – अडचणीत अडकलेला किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण देवाला साकडे घालत असतो. आपली मनोकामना पूर्ण झाली की तो देवाला बोललेला नवस फेडतो. असाच नवस अलिबाग तालुक्यातील हेमनगर ग्रामस्थानी महेंद्र दळवी आमदार व्हावे यासाठी देवीकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने २३ ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र दळवी यांनी फळे, मिठाई, गुळाची तराजू तुला केली जाणार आहे. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी यांनी दिली आहे. गेल्यावर्षी २३ ऑक्टोबर रोजीच विधानसभेचा निकाल लागून महेंद्र दळवी निवडून आले असल्याने त्याच दिवशी त्याची तुला केली जात आहे.

 

 

 


अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्षे शेकापचे वर्चस्व होते. एखादा अपवाद वगळता नेहमी शेकापचा आमदार विधानसभेत निवडून आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महेंद्र दळवी याना उमेदवारी दिली होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेचा आमदार निवडून यावा यासाठी शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळ हेमनगर, नवीन वाघवीरा तळेश्वरवाडी येथील ग्रामस्थानी शाश्वत अशा भवानी देवीकडे साकडे घातले होते.

 

 

 


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग मुरुड मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विजयी झाले. हेमनगर ग्रामस्थानी देवीकडे घातलेले साकडे पूर्ण झाले. त्यामुळे २३ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता आमदार महेंद्र दळवी यांची तराजू तुला केली जाणार आहे. फळे, लाडू, मिठाई, गूळ याने तुला केली जाणार आहे. असे शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here