भारतीय सौर १ कार्तिक शके १९४२, निज आश्विन शुक्ल सप्तमी सकाळी ६.५६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा उत्तररात्री १.२७ पर्यंत, चंद्रराशी : धनू सकाळी ७.०१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा रात्री ११.५८ पर्यंत, सूर्योदय: सकाळी ६.३७, सूर्यास्त: सायं. ६.०८, चंद्रोदय: दुपारी १.०३, चंद्रास्त: रात्री १२.२५.
आजचे शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त : पहाटे ०४ वाजून ४५ मिनिटे ते ०५ वाजून ३६ मिनिटे.
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २८ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटे ते ०२ वाजून ४३ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४० मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : सायंकाळी ०६ वाजून ५६ मिनिट ते ०८ वाजून ३४ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून ३२ मिनिटे ते ०५ वाजून ५६ मिनिटे.
सर्वार्थ सिद्धि योग : मध्यरात्री ०१ वाजून २८ मिनिटे ते सकाळी ०६ वाजून २८ मिनिटे.
आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.
यमगंड : दुपारी ०३ वाजून ३० मिनिटे ते ०४ वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
वर्ज्य काळ : सकाळी ०९ वाजून ०९ मिनिटे ते १० वाजून ४७ मिनिटे.
दुर्मुहूर्त काळ : सकाळी ०८ वाजून ४२ मिनिटे ते ०९ वाजून २७ मिनिटे आणि दुपारी १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटे.
राशिभविष्य :
मेष : उत्तम मनःशांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. व्यवसायासंदर्भात निर्णय घेताना सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवावी. कार्यक्षेत्रात कामे सुलभतेने पार पडतील. कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या नातेसंबंधात ताजेपणा आल्याचे जाणवेल. आपले ध्येय गाठण्यासाठी हरसंभव प्रयत्न करावेत. कोणाकडूनही अधिक अपेक्षा ठेवू नयेत.
वृषभ : जोडीदाराच्या विचाराने पुढे चालला. स्वप्नातून बाहेर येऊन योग्य कामाला वेळीच सुरुवात करा. आर्थिक पातळीवर भाग्याची उत्तम साथ लाभेल. व्यापारानिमित्तचे प्रवास लाभदायक ठरू शकतील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. चोरी होण्याची शक्यता संभवते.
मिथुन : नातेवाईकांशी दुरावलेले संबंध जुळतील. आपल्या धाकट्या भावंडांची काळजी घ्या. आजचा दिवस मध्यम फलदायी असू शकेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत कराल. वादविवादापासून दूर राहावे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची मदत मोलाची ठरेल. नकारात्मकता, निराशा टाळावी. विद्यार्थ्यांनी उत्तम कालावधी.
कर्क : पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारेच करा. नातेवाईकांकडून फसवणूक होऊन देऊ नका. दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि सकारात्मकतेने होईल. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्ग आणि सहकारी प्रोत्साहन देतील. मुलांच्या करिअरविषयीची चिंता समाप्त होऊ शकेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. सन्मान प्राप्त होऊ शकतील.
सिंह : नोकरीमध्ये नवीन अधिकार मिळतील. सहज यश प्राप्त करण्याचा पराक्रम कराल. जोडीदाराशी लाभलेली साथ प्रसन्नता प्रदान करेल. संस्मरणीय क्षण व्यतीत कराल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे कौतुक होईल. आळस झटकून कार्यरत राहाल.
कन्या : अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. कार्यक्षेत्रात नव्या संधी प्राप्त होऊ शकतील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. परदेशातील संस्थेशी करार वा भागीदारी करण्यात अनुकूल कालावधी. आपले विचार खुलेपणाने मांडावेत. उत्साह आणि सकारात्मकता संचारेल. आनंदाची अनुभूती घ्याल.
तुळ : घरासाठी पैसे खर्च होतील. मनात ठरवलेले काम पूर्ण होईल. समस्यांचे निराकरण होईल. प्रलंबित व्यापारी योजना पूर्णत्वास जाऊ शकतील. कार्यक्षेत्रातील नव्या संधींमुळे मनावरील तणाव कमी होईल. कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळावेत. सामाजिक व्याप्ती वृद्धिंगत होईल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतील.
वृश्चिक : द्विधा मन:स्थिती होत असल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. भागीदारी व्यवसायामध्ये यश मिळेल. नवीन ओळखीचा भविष्यात लाभ मिळू शकेल. व्यवसायात नवीन उत्साहाने कार्यरत राहाल. हाती घेतलेली कामे, प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. मात्र, काही नव्या समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल.
धनु : जोडीदाराकडून प्रशंसा होईल. समोराच्या व्यक्तीस भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देऊ नका. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. जुन्या मित्रांमुळे प्रसन्नता लाभेल. विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. नियम, कायदे काटेकोरपणे पाळावेत.
मकर : घरासंबंधी निर्णय करताना दुसऱ्यांची चर्चा करा. व्यवसायात पूर्ण माहिती घेऊन पुढे जा. अनिश्चिततेचे ढग दूर होतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मान, सन्मान प्राप्त होतील. परदेशात असलेल्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील. सासरच्या मंडळींकडून सहकार्य प्राप्त होईल. जोडीदाराची साथ आणि सहकार्य लाभेल.
कुंभ : मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन काम करा. कार्यक्षेत्रात भविष्यातील योजनांवर कामे कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. चौकस राहून कार्यरत राहणे हिताचे ठरेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना सकारात्मक काळ.
मीन : अनेक दिवसांचे अडून राहिलेले काम चटकन पूर्ण होईल. समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकू नका. व्यवसायिक आणि रचनात्मक कार्यक्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभाचे योग संभवतात. प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. धैर्य, संयम बाळगून समस्यांचा सामना करणे हिताचे ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होईल.







