सिटी सेंट्रल मॉलला भीषण आग

city-mall

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये गुरुवार (दि. २१) रात्री ९ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल घोषित केला असून घटनास्थळी ४० पेक्षा जास्त बंब, जेटी, टँकर दाखल झाले आहेत.

 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंट्रल या चार मजली मॉलमध्ये २०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. दुसऱ्या मजल्यावरिल असलेल्या एक मोबाईल असेसरीजच्या दुकानाला प्रथम ही आग लागली. त्यानंतर ही आग इतर दुकानांमध्ये पसरत गेली. तेव्हा या मॉलमध्ये ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

 

मात्र मॉल काचेने पूर्णपणे बंदीस्त असल्याने आतमध्ये आगीचा धूर मोठ्या प्रमाणत पसरला होता. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ९ तासानंतर आगीचे प्रमाण आणखी वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाने ब्रिगेड कॉल घोषित केला आहे. घटनास्थळी ४० पेक्षा जास्त बंब, जेटी, टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अग्निशमन दलाचे शेकडो जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here