धरणगाव (योगेश पी पाटील) – शहरातील नाभिक समाजातील सलून कटिंग दुकान दारांना मा. ना.पालकमंत्री गुलाबरावजी पाटील सो
यांच्या हस्ते सलून साठी लागणाऱ्या किड्स चे वाटप करण्यात आले.
मार्च महिन्यापासून नाभिक समाजातील केस कर्तनालयातील सलून बंद होते त्यामुळे कोरोना या विषाणूमुळे चार महिन्यापासून त्यांची अतिशय बिकट परिस्थिती झाली होती त्यांच्या या समस्या घेऊन कमलेश बोरसे,सतीश बोरसे व नाभिक समाज सलून दुकानाचे अध्यक्ष राजू बोरसे यांनी पालकमंत्र्यांना आपल्या समस्या सांगितल्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी तात्काळ पाळधी व धरणगाव येथील बांधवाना कोरोना पासून सावधगिरी बाळगावी या उद्देशाने किड्स वाटप केले तसेच परीट समाजाला सुद्धा त्यांना आवश्यक ते किड्स साहित्य तात्काळ देण्यात येतील असे आश्वासन दिले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे, नगराध्यक्ष नीलेश चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, गटनेते पप्पू भावे,नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन, संजय चौधरी,जितेंद्र धनगर, भागवत चौधरी,सुरेश महाजन, नंदू पाटील,अजय चव्हाण,धीरेंद्र पूर्भे,बालु जाधव,सुरेश पारेराव, रवींद्र जाधव,बुट्या पाटील, समाधान पाटील,राहुल रोकडे,विनोद रोकडे,रवींद्र कंखरे,वाल्मिक पाटील,योगेश पी पाटील,अरविंद चौधरी,विलास पवार,गोलू चौधरी सन्माननीय नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी गुलाबरावजी पाटील पालकमंत्री,जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी कोरोना संबंधित घ्यावयाच्या दक्षता व अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचे आदेश दिलेत. सुत्रसंचलन नाभिक समाज अध्यक्ष सतीश बोरसे यांनी केले.
Home Uncategorized पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नाभिक समाजाला केस कर्तनासाठी कीट वाटप







