पोलीस सेवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी चित्रपट अभिनेता विनायक जयकर

मुंबई (प्रकाश संकपाळ) – विविध सामाजिक व संस्कृतिक संघटने मध्ये चांगल्या प्रकारे सहभाग असणारे व समाज कार्याची आवड असणारे आणि चित्रपट व मालिकांमध्ये अभिनय करत असलेले विनायक जयकर यांना पोलीस संघटनेत काम करण्याची जिद्द आहे.
संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी निवड केली आहे.हि निवड शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे,उपाध्यक्ष धर्मेंद्र आगरवाल,सरचिटणीस अनिल सूर्यवंशी व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. चित्रपट अभिनेते विनायक जयकर यांच्या निवडीमुळे नाट्य व चित्रपट कलाकारांनी तसेच समाजातील अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here