ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा गृहरक्षक दल संघर्ष समिती मा श्री सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार नुकतेच बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस आयुक्त मा श्री जयंत बजबले यांचे समाजसेवकांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते कोरोणा महामारी मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या श्री अमन वर्मा , श्री रत्नेश दुबे, श्री साहिदअली हासमी समाजसेवकांना कोरोणा योद्धा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच कोरोना महामारी मध्ये प्रत्येक घरी जाऊन जनजागृती करणारे व आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक कुटुंबाची नोंदणी करणारे अंगणवाडी सेविका यांची सुद्धा कोरोना योद्धा म्हणून खूप मोलाचे सहकार्य आहे या अंगणवाडी सेविका
यांच्या कार्याची दखल म्हणून श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा श्री विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलिस ठाण्याचे ASI मा श्री प्रवीण लोटणकर यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका सौ नलिनी संतोष सावंत , मदतनीस वंदना ब्रह्मदेव सरफरे यांना कोरोना योद्धा गौरव ने सन्मानित करण्यात आले.










