नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर श्री जयवंत सुतार यांनी शिरवणे येथे रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जवळ पास १०० हुन अधिक जणांनी आपले रक्तदान केले तसेच प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व वाफ (स्टीम) घेण्याची मशीन ही भेटवस्तू म्हणून देण्यात आली होती
रक्त दान शिबिर रविवार सकाळी १० ते दुपारी ०२ या दरम्यान आयोजित केले होते. तर शुक्रवार दिनांक २४/१०/२० रोजी सर्व रक्तदाते यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्लाझ्मा दाते श्री महेश घरत (पत्रकार) यांचा ही सन्मान करण्यात आला
या प्रसंगी मा महापौर श्री जयवंत सुतार साहेब,मा नगरसेविका सौ. माधुरीताई सुतार ,समाजसेवक श्री जयेंद्र सुतार ,डॉ राजेशजी पाटील , नवरात्री उत्सवाचे अध्यक्ष हनुमंत रोडे , श्री नरेश सुतार व इतर मान्यवर यांनी उपस्थिती दर्शविली.







