मुंबई (सिध्दार्थ जाधव) – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि वैद्य व प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा होमगार्ड संघर्ष समिती गृहरक्षक दल यांच्या पुढाकाराने गेल्या दोन चार दिवसांपासून जे पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रत्येक पॉइंटवर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे आपल्या कुटुंबांना लांब ठेवून पोलीस अधिकारी ,पोलीस कर्मचारी व सफाई कर्मचारी समाजातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनाशी दोन हात करून ते देशसेवा करत आहे त्यात ठाण्यातील एक डॉक्टर पोलिसांना गेल्या ३ महिन्यांपासून निस्वार्थ दोन टाइम कोरा चहा देत आहे ते सुद्धा आपल्या ४ चाकी गाडीतून भिवंडीपर्यंत पोलिसांना कोरा चहा देत आहे त्यात आपला डॉक्टरी पेशा सांभाळून ते पोलिसांची सेवा करत आहे त्या डॉक्टर सॅम यांना ठाणे पोलिसांकडून मानाचा मुजरा करत त्यांचा गौरव केला.
डॉ.सॅम कामाची दखल नौपाडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते कोविंद योद्धा गौरव २०२० सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले तसेच पोलीस मुख्यालय येथील कचरा पेटीच्या येथे दर दिवशी कचरा साठत असतो त्या दुर्गंधीचा त्रास पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना होऊ नये म्हणून दर दिवशी ते सफाई कर्मचारी हे कचरा घेऊन जात असतात केवळ आपल्या पोलिसांना कोणत्याही रोगराई होऊ नये म्हणून ते नेहमी पोलिसांच्या स्वच्छतेसाठी झगडत असतात अशा ५० सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र ,होमिओ पती औषध , माक्सचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत नेहमीप्रमाणे ठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत कळवा पोलिस स्टेशन वाहतूक ,नौपाडा पोलीस स्टेशन तसेच मुख्यालय ठाणे ,वागळे पोलिस स्टेशन येथे प्रत्येक पॉइंटला जाऊन अधिकारी कर्मचारी यांना कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र देण्यात आले हा कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र यामध्ये कोणताही भेदभाव न करता जे प्रत्यक्ष कोरोनायोध्दामध्ये देशसेवा करत आहे अशा डॉक्टर, वकील सफाई कर्मचारी ,नर्स, वॉर्डबॉय ,नगरपालिका, महानगरपालिका ,गृहरक्षक दल ,सरकारी अधिकारी कर्मचारी, आरटीओ ,आशासेविका यांना महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन मार्फत ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्राने सन्मानित करण्याचे काम पोलीस बॉईज असोसिएशनची टीम करत आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिस स्टेशनला सॅनिटायझर, औषध फवारणी करण्याचे काम अजूनसुद्धा चालू आहे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी धीरज पार्सेकर (निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) , सुशील मोरे (निवड समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य), अमोल माने (प्रदेशाध्यक्ष मुंबई), अमोल पटेकर (सरचिटणीस मुंबई), पालघर मीरा भाईंदर ,नवी मुंबई टीमने केले होते.
जो पर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही तोपर्यंत पोलीस बॉईज असोसिएशन दिवसरात्र पोलिसांच्या न्याय हक्कासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्य करीत असलेल्या असोसिएशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







