भाजपाची कार्यकारिणी जाहीर; खा. रक्षाताई खडसे प्रदेश सरचिटणीसपदी

मुंबई (प्रतिनिधी) – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी झाली आहे. या कार्यकारिणी खा.रक्षाताई खडसे यांना प्रदेश सरचिटणीस पद मिळाल्याने, त्यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्याला प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधीत्व मिळाले आहे.
कार्यकारिणी घोषित करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना संकटामुळे भाजपाची कार्यकारिणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे यादी जाहीर होण्यास थोडा वेळ लागला. आता माझ्याबरोबर १२ प्रदेश उपाध्यक्ष व ५ सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस, ६ जनरल सेक्रेटरी, १ कोषाध्यक्ष आहे. याशिवाय ७ प्रमुख मोर्चे असतात, त्याचेही अध्यक्ष आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त १८ प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत.
यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पुढीलप्रमाणे सदस्य आहेत. महामंत्री – सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांडे, रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक तर १२ उपाध्यक्षांमध्ये माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रितम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खा.कपिल पाटील, खा.भारती पवार, जयप्रकाश ठाकूर यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी माजी आमदार प्रमोद जठार, संजय पुराम, ॲड.धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षाताई खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाणे, अर्चना तेहटकर यांची निवड झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here