जळगाव जिल्ह्यात आज २०९ कोरोना बाधितांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर आज (दि.३) प्राप्त झालेल्या अहवालातील २०९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या २०९ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५५, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ १८, अमळनेर ८, चोपडा ११, पाचोरा १, भडगाव १३, धरणगाव ६, यावल ११, एरंडोल २८, जामनेर ७, रावेर १०, पारोळा २२, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १, बोदवड १ असा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४००७ इतकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here