अलिबाग येथे श्री धावीर महाराज पालखी सोहळा संपन्न

dhavir-maharaj-palkhi

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करीत आज 26 ऑक्टोबर रोजी श्री धावीर महाराज पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी नागरिकांना श्री धावीर महाराज पालखीचे दर्शन घेता यावे, याकरिता पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वत:च मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री धावीर महाराज पालखी सोहळ्याचे ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून दिले.dhavir-maharaj

 

रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यास आज पहाटे पारंपरिक विधीवत पुजा व प्रथेनुसार पोलिसांची सशस्त्र मानवं दना देवून सुरवात झाली. यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतले.

 

यावर्षी करोनामुळे साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. रोहेकरांनीदेखील शासनाच्या सुचनांचे पालन करीत त्यास प्रतिसाद दिला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here