घाटकोपर विभागात बेटी बचाओ…बेटी पढाओ अभियानाबाबत जनजागृती

ghatkoper

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – महिला व बालविकास, महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर – २ (बीट क्र.२) सिडिपीओ राहुल मोरे, मुख्य सेविका वैयजंती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर विभागात बेटी बचाओ…बेटी पढाओ अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.

 

शासनाने आयोजित केलेल्या १७ ते २४ ऑक्टोबर २०२० रोजीच्या दरम्यान बेटी बचाओ.. बेढी पढाओ.. कार्यक्रमाअंतर्गत सर्व सेविका, मदतनीस यांनी मनपाच्या एन वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या विविध विभागात विविध कार्यक्रम घेऊन विभागात शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला. बेढी बचाओ.. बेढी पढाओ.. हा संदेश देत समाजात जनजागृती केली. या कार्यक्रमात योजनेचे पदाधिकारी, मुख्य सेविका तसेच सर्व सेविका आणि मदतनीस यांची उपस्थिती लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here