भारतीय सौर ५ कार्तिक शके१९४२, निज आश्विन शुक्ल एकादशी सकाळी १०.४६ पर्यंत,चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा अहोरात्र, चंद्रराशी : कुंभ उत्तररात्री २.३० पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती, सूर्योदय: सकाळी ६.३८, सूर्यास्त: सायं. ६.०७, चंद्रोदय: दुपारी ३.५१, चंद्रास्त: पहाटे ३.०५.
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५६ मिनिटे ते ०२ वाजून ४१ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : रात्री १२ वाजून २० मिनिटे ते ०२ वाजून ०६ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटे ते ०५ वाजून ५३ मिनिटे.
रवि योग : सकाळी ०६ वाजून ३० मिनिटे ते ०६ वाजून ३७ मिनिटे.
आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
यमगंड : सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटे.
भद्रा काळ : सकाळी ०६ वाजून ३० मिनिटे ते १० वाजून ४६ मिनिटे.
दिनविशेष: पाशांकुशा एकादशी.
आजचे राशिभविष्य
मेष : प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत आणि खर्च यांमध्ये संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जाऊ शकतील. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय कष्टकारक ठरू शकतील. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. एखाद्या घटना वा प्रसंगामुळे मन विचलित होऊ शकेल.
वृषभ : छोटे प्रवास संभवतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नकारात्मक विचारांना हद्दपार करणायची क्षमता वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कष्टाशिवाय गोष्टी हाती लागणार नाहीत. यात्रा सुखद व लाभदायक ठरतील. मनोरंजनाकडे कल राहील. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल.
मिथुन : प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस उत्तम फलदायी असेल. जुन्या विचारांना मागे सारा. आर्थिक आघाडीवरील प्रयत्न यशकारक ठरू शकतील. देवावरची श्रद्धा वाढेल. एखाद्या सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकेल. तज्ज्ञ व्यक्तीच्या भेटी-गाठीचे योग.
कर्क : आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. आजचा दिवस शुभफल देणारा ठरू शकेल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. आर्थिक पातळीवरील प्रयत्न सकारात्मक ठरू शकतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वाणीतील माधुर्य जपल्यास प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायिक भागीदारीत फायदा होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
सिंह : कार्यक्षेत्रात समस्या उद्भवू शकतील. प्रवास यशकारक ठरतील. आजचा दिवस संमिश्र असेल. वाणीतील माधुर्य जपा. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. नोकरीत वर्चस्व राहील. कार्यक्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.
कन्या : विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. आत्मविश्वास वाढीस लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतील.
तुळ : धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस. मुलांकडून सुखद वार्ता मिळतील. धार्मिक ग्रंथाचे लिखाण वाचन होईल. एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकेल. कामाचा व्याप वाढेल. विरोधक पराभूत होतील.
वृश्चिक : व्यवसायिक योजनांना बळ मिळेल. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल असेल. आजचा दिवस शुभ असेल. भेटवस्तू व मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. व्यवसायात जोखमीचे पाऊल उचलताना नीट विचार करा. एखादा महत्त्वाचा निर्णय शक्य असल्यास लांबणीवर टाका जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात थकवा जाणवेल.
धनु : स्पर्धांमध्ये यशप्राप्त करू शकाल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामांचा कंटाळा करू नका. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. एखादी मौल्यवान वस्तू गहाळ होण्याचे संकेत. सावध राहावे.
मकर : आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मात्र, आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आपला पराक्रम दिसून येईल. कोणावरही अति विश्वास ठेवू नये. सारासार विचारानंतरच निर्णय घेणे हिताचे ठरेल.
कुंभ : मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक आघाडीवरील प्रयत्न यशकारक ठरू शकतील. धावपळ करावी लागेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकवा. देवावरील श्रद्धा वाढेल. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात व्यतीत होईल. एकूणच दिवस उत्तम ठरेल.
मीन : गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बोलतांना शब्दांचा वापर जपून करा. जोडीदाराकडून आपल्याला फायदा होईल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. प्रवास लाभदायक ठरतील. एखादी वार्ता मन विचलित करेल. मिळकतीचे नवे स्रोत सापडू शकतील.







