सोशल डिस्टन्सिंगची फज्जा आणि डान्सबार व्यावसायिकाची मज्जा!

dancbar
संग्रहित छायाचित्र

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – उल्हासनगर मधील श्रीराम चौकातील बहुचर्चित होटल नाइंटी बार सरकारने दिलेले कोणत्याही नियमाचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता डान्सबार उशिरा रात्री २ वाजेपर्यंत चालवत आहे.

 

गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत व ते ५ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत पण त्याचीही नियमावली राज्य सरकारने दिलेली आहे, या नियमावलीचे पालन करणे हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक आहे कॉविड सारख्या महामारीच्या कसलीही भीती न बाळगता, ग्राहकांना मास्कशिवाय प्रवेश दिला जातोय, त्यांची स्क्रिनिंग व नोंद ही होत नाही, एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहकांना एकाच वेळी बसवले जातात, दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर ही नाही, ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा याचाही भान ठेवला जात नाही.

 

बारमध्ये १० महिलांनाची परवानगी असून येथे ३०-३५ महिला असून ह्या बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करत आहेत व ग्राहकांना बारबालांवर दौलतजादा करण्यास आकर्षित करून घेत आहेत। हा बारमालक कोणाच्याही जीवाची पर्वा न करता आपल्या फायद्यासाठी त्याला मिळालेल्या सवलतींचा अनधिकृतपणे वापर करत आहे , संबंधित डान्सबार वर दंडात्मक कारवाई का होत नाही ..? स्थानिक पोलिस ह्या डान्सबारवर काना डोळा का करत आहे…? कोणाच्या वरदहस्ताखाली हा बार मनमानी करत आहे..? असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत!

 

https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/634180750600576/?t=1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here