खासदार सौ.भारतीताई वाघ यांना निवेदन देवून, राष्ट्रपतींना केली परवानगीची विनंती
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – कांद्याचे भाव पडल्याने तसेच निर्यात बंदी घातल्याने, कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिरावून नेले आणि सरकारनेही पाठ फिरवली. यामुळे निराश झालेल्या चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकरी गणेश निंबाळकर यांनी दिंडोरीच्या खासदार सौ.भारतीताई वाघ यांच्याकडे निवेदन देवून, राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, खासदार भारतीताई समोर येऊन नेहमीच निडरपणे शेतकरी बाजू संसदेत मांडतात याची खात्री असल्याने पत्र लिहीत आहे. केंद्र सरकारच्या कांदा मर्यादित खरेदी धोरणाविरोधात व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला त्यात सर्वाधिक नुकसान नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्याच माथी बसणार हे निश्चित
50 रु कांदा हा महाग नाही हे व्यवस्थेला कसं पटवून द्यावं हा एक मुद्दाच आहे पण केंद्र ,राज्य ,व्यापारी यांच्यात सुवर्णमध्य लवकर निघावा यासाठी आपण मध्यस्थी करावी. तसेच एकतर स्टॉक लिमिट काढून घ्या अथवा सरकारने 60, 50 आणि 40 अश्या तीन दराने प्रतवारीनुसार कांदा खरेदी करून रेशनवर ज्या दराने जमेल त्या दरावर ग्राहकाला द्यावा अन्यथा तुमच्या स्टॉक लिमिट पॉलिसीला स्वीकारणारी खरेदी करणारी व्यापारी मंडळी द्या पण निसर्गाने चोहोबाजूने झोडपल्यानंतर एकमेव आलेली संधी जर सरकारांच्या नाकर्तेपणामुळे जाणार असेल तर शेतकऱ्यांना राष्ट्रपतींच्या परवानगीने इच्छामरणाचा मार्ग मोकळा करून द्यावा.
गणेश निंबाळकर चांदवड यांनी केली राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची मागणी
खा .भारतीताई पवार यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती केली आहे. या परिस्थितीचा विचार करता सरकारने कांद्याचे लिलाव तात्काळ सुरु करावेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून सर्व बाजार समितींना पत्र लिहून विनंती केली आहे.
– कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना, नाशिक








