हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याचा राग आल्याने अॅडमिनवर प्राणघातक हल्ला

प्राणघातक हल्ला

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती यादव (४९) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६च्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेश्राम पुतळा चौक परिसरात घडली.

 

सुनील करमचंद अलीमचंदानी (मेश्राम पुतळा चौक, सदर) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. सुनील आणि चंद्रमणी हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील यांनी यांनी दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. यात आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही होते. मात्र, या दोघांनी काही दिवसांपूर्वी काही मेसेजवर आक्षेप घेतला. यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही ग्रुपमधून काढून टाकले. रागाच्या भरात आरोपींनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यलयाजवळ बोलावले. तेथे त्यांच्यावर छिन्नीने प्राणघातक हल्ला केला. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here