इचलकरंजी (प्रतिनिधी) – परिसरातील हातकलंगणे व शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अपंग दाखले घेण्यासाठी कोल्हापूर येथे जावे लागते. मात्र हे त्यांच्या दृष्टीने त्रासाचे असल्याने, इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये हे दाखले देण्यात यावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरक यांना प्रहार अपंग क्रांती संस्थेने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, हातकणंगले तालुक्यातील 62 गावातील व शिरोळ तालुक्यातील 53 गावातील अंध अस्थिव्यंग, कर्णबधिर, मूकबधिर, मतीमंद व 21 प्रकारच्या दिव्यांग बांधवाना कोल्हापूर CPR येथे दाखला काढण्यासाठी 2 ते 3 वेळा जावे लागते. त्यामध्ये लकवा मारलेले 100% अंध-अपंग मतीमंद असणारे दिव्यांग यांना कोल्हापूर येथे दाखला काढण्यासाठी जास्त त्रास होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील अपंग बांधव CPR ला येतअसतात तेथे आठवड्यातून बुधवारी 10 ते 2 फक्त अपंग सर्टिफिकेट साठी तपासणी केली जाते त्यामुळे अपंग व्यक्तींना वेळेचा व गर्दीचा जास्त त्रास होतो. तरी इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात दाखले काढण्याची सोय करावी.







