पालघर येथे जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape-on-minor

ठाणे (उपसंपादक सुनील बनसोडे) – पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगर चोळा गावातील अल्पवयीन मुलगी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.

 

आरोपी पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्याविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. यामुळे तिने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना लगेचच दिली नाही. शुक्रवारी तिने घडला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी मनोर पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

 

याप्रकरणी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि ५५६ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here