आता बांगलादेशनेसुध्दा घेतला भारताशी पंगा

ढाका – भारत चीन सीमेवर वाद सुरु असताना नेपाळनेसुद्धा त्यांच्या नकाशात भारतीय भूभाग समाविष्ट करून कुरापती सुरु केल्या आहेत. भारत चीन संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच आता बांगलादेशकडूनही वेगळ्याच हालचाली केल्या जात आहे. पश्चिम बंगालमधील पेट्रोपोल बॉर्डरवरून भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात केली जाते. बांगलादेशी व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या आंदोलनामुळे गुरुवारी पेट्रोपोल सीमेवरून बांगलादेशात भारताचा एकही ट्रक गेला नाही. पर्यायाने निर्यात होणारा माल बांगलादेशात पोहोचू शकला नाही.
बांगलादेश सीमेवर दोन्ही बाजूला शेकडो ट्रक उभा आहेत. विरोध करत असलेल्या बांगलादेशी व्यापाऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत भारत बांगलादेशातून आयातीला मंजुरी देत नाही तोपर्यंत भारतातून निर्यातीला परवानगी देणार नाही. विरोध करणाऱ्यांनी भारतीय ट्रक बांगलादेशमध्ये जाण्यापासून रोखले. बुधवारी अनेक तास ही वाहतूक बंद ठेवली. त्यांनी म्हटलं की, जोपर्यंत भारत आयातीला मंजुरी देणार नाही तोपर्यंत सीमा बंद राहील. यामुळे दोन्ही बाजूला शेकडो ट्रक उभा असून त्यातील माल खराब होत चालला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here