पुणे (विशेष प्रतिनिधी) – जयपूर शांती सद्भाव एवं सामाजिक न्याय सेवा कार्याला समर्पित आंतरराष्ट्रीय संस्था गांधी पीस फॉउंडेशन,नेपाळ चे चेअरमन व संस्थापक डॉ.लाल बहादूर राणा यांनी कळवा,ठाणे मूळ गाव.वेंगुर्ले जि.सिंधुदुर्ग निवासी युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स कौन्सिल,भारत या संस्थेचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र व गुजरात राज्य प्रभारी मनिष सुरेश नेरुरकर यांना सामाजिक,शैक्षणिक,सर्वांगीण उच्चतम मानक प्रदर्शित करण्यासाठी डॉक्टरेट या उपाधि ने:(विषय:महात्मा गांधी दर्शन,शिक्षा आणि मानवता) गौवरवान्वीत केले आहे.आंतरराष्ट्रीय गांधी पीस फॉउंडेशन,नेपाळ चे चेअरमन व संस्थापक डॉ.लाल बहादूर राणा या वेळेस संबोधीत करताना श्री मनिष नेरुरकर यांना डॉक्टरेट ची उपाधी देताना आम्हाला गर्व आणि आनंद होत आहे,त्यांच्या सामाजिक,धार्मिक,राजनीतिक आणि शैक्षणिक कार्य साठी ही उपाधि प्रदान करण्यात आली आहे असे मत व्यक्त केले आणि त्यांच्या भावी सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा हि दिल्यात.
डॉ.मनिष नेरुरकर हे कृषी पदवीधर असून,त्यांनी पदव्युत्तर मास्टर इन बिझनेस मॅनेजमेण्ट हि केले आहे ,तसेच ते सध्या डॉक्टरेट इन मॅनेजमेण्ट हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेण्ट स्टुडिज,मुंबई या संस्थेतून करत आहेत.गांधी रिसर्च फॉउंडेशन,जळगाव या संस्थेतून शाश्वत ग्रामीण पुनर्निर्माण या विषयात डिप्लोमा ही करत आहेत.व्यवसायाने ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विक्री व व्यवस्थान या विभागात मागील १६ वर्षांपासून कार्य करीत आहेत.त्यांनी मोटोरोला,व्हर्गिन मोबाईल,भारती एअरटेल,रिलायन्स कम्म्युनिकेशन,रिलायन्स जिओ या कंपन्यांमध्ये व्यवस्थापक या पदावर कार्य केले आहे.सध्या ते सिस्का,पुणे या कंपनीत विभागीय व्यवस्थापक,पुणे या पदावर कार्यरत आहेत.
डॉ.मनिष नेरुरकर हें युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स कौन्सिल,भारत,राष्ट्रीय महासचिव,भ्रष्टाचार विरोधी संघटना,महाराष्ट्र चेअरमन,नॅशनल क्राईम इन्वेस्टीगेशन ब्युरो,भारत,जॉईंट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर,प्रेस संपादक व पत्रकार संघटना,महाराष्ट्र राज्य सह संघटक,ट्रॅफिक वेलफेअर अँड सेफ्टी फॉउंडेशन,महाराष्ट्र समानव्यक या सामाजिक संघटनातून आपले सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांच्या या यश बद्दल युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स,भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुण बकोलीय्या,राष्ट्रीय महासचिव श्री.हेमराज ड्डीग्वालं,महिला राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती.सुमन मौर्य,राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.गजानन शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार आणि समाज बांधवांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.







