कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस (दि. २८ ऑक्टोबर) पासून सुरू करण्यात येत आहे. तर ही गाडी कोल्हापूर येथून दि. ३० पासून सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.
अनलॉकनंतर देशात टप्प्याटप्प्याने रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. यापूर्वी कोयना, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन इत्यादी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आता कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस सुरू होत असल्याने मिरज, हातकणंगले कोल्हापूर येथील प्रवाशांची सोय होणार आहे.
या गाडीला १ प्रथम वातानुकुलीत, १ द्वितीय वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत थ्री टियर, १२ स्लीपर आणि २ द्वितीय श्रेणी सिटींग कोच जोडण्यात येणार आहेत.







