पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते लक्ष्मण कोळीला मदतीचा धनादेश
सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – राज्यपतळीवर धावणारा पोतराजाचा मुलगा धावपट्टू लक्ष्मण कोळीच्या संघर्षाची दखल नाम फाऊंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी घेतली. लक्ष्मणला मदतीसाठी विशेष कोट्यातून धनादेश सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते देण्यात आज आला.
यावेळी नामचे प्रातिनिधीक प्रतिनिधी म्हणून पत्रकार चंद्रशेखर भांगे आणि नितीन कापरे यांची उपस्थिती होती. यावेळी सातपुते यांनीही धावपट्टू कोळीस मदत केली. धावपट्टू कोळी हा अकरावी मध्ये शिकत असून त्याने गरीबीतून गेल्या वर्षी साताऱ्यात झालेल्या शालेय मैदानी स्पधेत धडक मारली. त्यानंतर नांदेड नगर सातारा येथे मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाला होता. परंतु गरीबीमुळे पोतराजाचं जीवन जगत होता. त्याची व्यथा सर्व माध्यमांमध्ये झळकताच चंद्रशेखर भांगे यांच्या माध्यमातून नामने आर्थिक मदत केली आहे.








