कोल्हापूरातील विमानसेवेचा टेकऑफ

kolhapur-takeoff

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – तब्बल सात महिन्यानंतर ट्रू जेटच्या मुंबई-कोल्हापूर विमानसेवेला मंगळवारी प्रारंभ झाला. मुंबईवरून आलेले विमान दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर लँडिंग झाले.

 

यातून सिनेअभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासह 30 प्रवासी आले तर कोल्हापूरहून 25 प्रवाशांना घेऊन विमानाने दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ केले. कोणताही स्वागत समारंभ न करता साध्या पद्धतीने प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.

 

16 मार्चपासून मुंबई – कोल्हापूर विमानसेवा बंद झाली. 25 मार्चपासून देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशांतर्गत विमानसेवा केंद्र सरकारने बंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here