मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – जान कुमार सानुने निक्की आणि राहुलशी वाद घालताना मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेकांनी त्याचा निषेध केला आहे. केवळ मराठी कलाकारांनीच नव्हे तर राजकीय पक्षांनी देखील जान कुमार सानूला लक्ष्य केले आहे.यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दीली आहे.देशमुख म्हणाले की ‘ जे झालं ते चुकीचं झालं , जान कुमार सोनूवर पोलीस कारवाई करतील.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘जान कुमार सानू. मराठी भाषेची याला चीड येते म्हणे.अरे तू कीड आहेस मोठी. मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमीनेट करतोय याला’, असं ट्वीट करत खोपकर यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाइक यांनी देखील, जान कुमार सानूला स्पर्धेतून वगळावं अशी मागणी केली आहे. ही बाब कदापि खपवून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया सरनाइक यांनी दिली आहे.







