कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा!

udhav-thakare

ऑनलाईन बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – अस्मानी संकटामुळे खान्देशातील बळीराजा संकटात सापडला आहे. अशात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खान्देशात त्वरीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. व्हीडिओ कॉन्फेसिगबव्दारा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा पक्षप्रमुखांनी या बैठकीत घेतला.

 

दसरा मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसोबत पक्षप्रमुखांची भेट ठरलेली असते. यंदा कोरोना संकटामुळे ही भेट झाली नाही. मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्हीसीब्दारे संपर्क साधून भेटीची ही परंपरा कायम ठेवली. राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते. या बैठकीत जळगावचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख घटना, घडामोडीसह शेतकरी, परतीच्या पावसाचा तडाखा, पक्षप्रमुख श्री.ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद आदी विषयांची माहिती गुलाबराव वाघ यांनी दिली.gulabrao-wagh

 

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यासह खान्देशातील कापसासह ज्वारी, मका, कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच लाकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असतांना ऐन दिवाळीत त्याचे दिवाळे निघाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मजबूरीचा लाभ खाजगी व्यापारी उठविण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावीत यासह ज्वारी, मका, कडधान्यांची शासकीय खरेदी सुरू करून शेतकन्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. कोरोना नियंत्रणात शासनाचे योग्य मार्गदर्शन, आपणाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचना, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सह जिल्ह्यातील आरोग्य व सर्व शासकीय खमेच्या अविरत प्रयत्नानंतर जिल्ह्यातील कोराना संकट नियंत्रणात आले. धोका टळला नसला तरी त्याची तिव्रता कमी करण्यात यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्वदीच्याही पुढे गेले असल्याचे गुलाबराव वाघ यांनी या बैठकीत सांगितले.

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चौफेर केलेल्या टोलेबाजीचे राजकीय पडसाद जिल्ह्यातही उमटले असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आपल्या ‘मार्मिक’ फटकेबाजीमुळे विरोधकांचे आवसान गळून पडले असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांचे अभिनंदनही गुलाबराव वाघ यांनी याप्रसंगी केले. काल दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता या व्हीसीला सुरूवात झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here