धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – धरणगाव येथील बालाजी महाराज रथउत्सव साजरा करण्यात आला या वेळी आरती चे मानकरी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील हे होते.
त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास विसावे,डी आर पाटील, डी जी पाटील आदी उपस्थित होते 
कोरोनाला प्रतिबंध म्हणून सात महिन्यापासून सर्वच सार्वजनिक तसेच धार्मिक उत्सव बंद असल्याने येथील श्री बालाजी महाराजांचा रथ गावात मिरवणूक न काढता बालाजी मंदिरापासून अवघ्या दहा पावलापर्यंत ओढून पूर्ववत बालाजी मंदिरापर्यंत नेण्यात आला.








