बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील शिवसैनिकांना मध्ये चांगलाच उत्साह संचारलयाचे चित्र आहे राज्यातील सत्ता तिन पक्षाच्या महाविकास आघाडी कडे असली तरी शिवसैनिकांनो तयार रहा राज्यात एकहाती भगवा फडकवायचाचं अवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये सारे काही आलबेल असले तरी तीन पक्षाचे सरकार नक्की किती दिवस धरेल या बाबतीत राजकीय वर्तुळात होत असते त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे
दसरा मेळाव्यात त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती मंगळवारी रात्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली ही चर्चा साधारण मध्य रात्रि पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळत आहे या चर्चेत ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवणार असुन त्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे असे म्हटले आहे ठाकरे यांनी एकहाती भगवा फडकवण्याची भाषाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला कितपत रुचेल या बाबत चर्चाना उधान आले आहे.







