रात्रीच्या वेळी दुकानांचे लोखंडीशटर तोडून चोरी करणा-या ४ सराईत चोरट्यांना १० तासांच्या आत अटक

thane-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनपुष्प सोसायटी मध्ये ‘सहकार सुपर बाजार’ असून सदर दुकानचे मालक हे दिनांक २५.१०.२०२० रोजी रात्री २२.०० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते ते दिनांक २६.१०.२०२० रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास दुकान उघडण्याकरिता आले असता त्यांना दुकानाचे बाहेरील बाजूस असलेले लोखंडी शटर हे कोणीतरी उचकटून तोडले असल्याचे निदर्शनास आले ते दुकानात गेले असता त्यांनी दुकानातील ड्रॉव्हरमध्ये किराणा मालाची विक्री करून त्यातून आलेले रुपये १०,000/-रोख रक्कम पाहिली असता त्यांना सदर रोख रक्कम व दुकानातील टेप रेकॉरडर चोरी गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी दिनांक २६.६.२०२०रोजी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडली पोलीस स्टेशन येथे गु.रजि. क्रमांक I २६९/२०२० IPC ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

 

सदर गुन्ह्याचा प्रकार पाहता यातील अनोळखी आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक यांना सूचना देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते.त्याचप्रमाणे पोलीस पथकाने आरोपींचा शोध होणेकामी काशी-मीरा भिवंडी,वागळे इस्टेट इत्यादी परिसरात जावून तपास केला व घटनेबाबत बातमीदार यांना माहिती देवून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.

 

दिनांक २६.१०.२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय व विश्वासहार्य माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास माहिती देवून केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने आझाद नगर रोड या ठिकाणी नियोजनपूर्वक सापळा रचून आरोपीत नामे १)सर्वेश अशोक गौड,वय-२१वर्षे,धंदा-मजूर २)शंकर सुधाकर हनवते,वय-३० वर्षे,धंदा- रिक्षा चालक३)राहल शिवाजी घोरपडे,वय-१९ वर्षे,धंदा- हाऊस कीपिंग ४)अक्षय सुरेश जाधव,वय-२७ वर्षे,धंदा-चालक,सर्व राहणार -वागळे इस्टेट,ठाणे यांना ताब्यात घेवून दिनांक २६.१०.२०२० रोजी अटक करण्यात आलेली असून त्यांचे कडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ८0,000/-रुपये किमतीची,चोरीतील टेप रेकॉरडर ५,000/-रुपये कि.चा व २५००/-रोख रक्कम असा एकूण ८७,५००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर वागळे इस्टेट व श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असून यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

 

आरोपीत यांना मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक २९.१०.२०२० रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाला आहे. _ नमूद कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,मा.सह पोलीस आयुक्त.श्री.सुरेश कुमार मेकला,मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,ठाणे श्री.अनिल कुंभारे,मा.पोलीस उपायुक्त,परि-५ श्री.अविनाश अंबुरे,मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग श्री.पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार,पो.नि(गुन्हे)अविनाश काळदाते,स.पो.नि सागर जाधव,पोलीस हवा/५०४७एस.बी.खरात,आर.एस.चौधरी/३४३२,चंद्रकांत गायकवाड/२५७९ आर.आर.पाटील/६२१७ पो. ना/१७८ आर.एस महापुरे,पो.ना.तायडे/१२६३ यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवा/आर. एस चौधरी/३४३२ हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here