अ.भा.मजदूर कल्याण सेवासंघातर्फे राज्यात गुटखाबंदी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र

fdi-commessinor

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मंगळवार दिनांक 26.10.2020 रोजी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अर्थात ‘राष्ट्रीय एकता’ च्या वतीने अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची त्यांच्या बांद्रा, मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन राज्यात पूर्णपणे गुटखाबंदी करण्यासंदर्भात पत्र सादर करण्यात आले.

 

यावेळी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष हुसेन मुनीर शेख, केंद्रीय उपविधी सदस्य व महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय बंसल, फिल्ड ऑफिसर धर्मेन्द्र कुमार जैसवारा तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश सुर्वे, ठाणे जिल्हा महासचिव इंजिनीयर योगेश राहणे-पाटील तसेच ठाणे जिल्हा महिला महासचिव सौ. मीना प्रकाश पन्हाळे व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here