मुंबई (हितेश मिस्त्री) – मी बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेली असतांना माझा बलात्कार झाला असता आणि बलात्कार करून माझी हत्या झाली असती.पण मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्री अमिषा पटेल हिने मुंबई परतल्यावर केला आहे.
त्याचबरोबर अमिषाने दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.प्रकाश चंद्रा हा गुंड माणूस आहे.मी अभिनेत्री म्हणून प्रकाश चंद्रा यांच्या प्रचाराला गेली होती पण त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावलं आणि गैरवर्तन केलं. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगलं बोला आणि २६ ऑक्टोबरला जे घडलं त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगलं बोल असं सांगितलं, असं चंद्रा यांनी म्हटल्याचे आमिषाने म्हटलं आहे.
चंद्रा यांनी मला धमकावत पाटण्यापासून ३ तास त्यांच्या प्रचारात सोबत राहावे यासाठी जबरदस्ती केली. मला त्याच दिवशी मुंबईत परतायचे होते, पण मला तसं करु दिलं नाही, असंही अमिषा म्हणाली.
मी बिहारमध्ये असल्याने शांत होते. मात्र, मला मुंबईला आल्यावर जगाला हे सत्य सांगायचं होतं. माझा बलात्कार आणि हत्या झाली असती, असा धक्कादायक खुलासा आमिषाने केला आहे.







