मुंबई (हितेश मिस्त्री) – महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल यादृष्टीने शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिला होता.यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांनी टोला लगावला आहे पवार म्हणाले ‘ राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आणि मंत्रालयावर भगवा फडकावण्यासाठी प्रयत्न करा हे वाक्य मी गेल्या तीस वर्षापासून ऐकतोय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री १० वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल यादृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश दिल्याची माहिती समोर आलीय.यावर प्रतिक्रिया देतांना शरद पवारांनी दमदार टोलेबाजी केली आहे.
दरम्यान, यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल. पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल, अशी खोचक टिप्पणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.







