नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झालीय.याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिलीय. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं टेस्ट करून घेण्याचं आवाहन इराणी यांनी केलं. बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये इराणी सक्रिय होत्या. गुजरातमध्येही पोटनिवडणुकांसाठी त्या सतत प्रचारात होत्या. गुजरातमध्ये वडोदऱ्यात आणि बिहारच्या बिकराममध्ये त्या प्रचारासाठी गेल्या होत्या.
भारतातील बर्याच राज्यात सणाच्या हंगामामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या पाच आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.







