शहादा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्तांचे आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते भुमी पुजन

shahada-bhumipujan

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात दळणवळण सोयीचे व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहे चांगल्या दर्जाचे रस्ते झाले की अनेक समस्या सुटतात यासाठी सर्वप्रथम आपण रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देत असून संपूर्ण मतदारसंघात विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले.

 

शहादा तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. राजेशजी पाडवी यांच्या हस्ते आज शहादा ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत 1) टावळाई ते मुबारकपूर रस्ता 2) इस्लामपूर अंबापुर ते धावडेकाटा रस्ता 3) म्हासावद ते कोकणपाडा रस्ता या प्रमुख रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात आले.

 

याप्रसंगी बोलताना आ. पाडवी म्हणाले की, मागील 7 महिन्यापासून थांबलेली विकास कामे सुरू करण्यात आली आहे, तसेच मतदारसंघातील लहान-मोठ्या गावांना जोडले जाणारे सर्व रस्ते करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केंद्र शासनाकडून 150 कोटी रुपयांची मागणी मागील काही दिवसांपूर्वी केली होती ती देखील मान्य झाली आहे. पुढे बोलताना आमदार पाडवी म्हणाले की, मतदारसंघाच्या ज्यापाड्यांवर विजेची सुविधा आजवर नहोती आशा ठिकाणी आजपर्यंत सुमारे दीड कोटीचे सोलर हायमस्ट लाईट व इतर ठिकाणी सुमारे तीन कोटीचे हायमस्ट लाईट बसविल्या आहेत, तसेच संपूर्ण देशभर आलेल्या covid-19 या भयानक महामारी च्यावेळेस स्थानिक आमदार निधीतून 50 लक्ष रुपये खर्चून वैद्यकीय साहित्याची मतदारसंघात कमी भासू नये यासाठी खर्च केले आहेत. यापुढे देखील मतदारसंघातील प्रत्येक गावातील रस्ते, गटार, सभागृह यासारख्या अनेक विविध कामांचे प्रस्ताव राज्यशासनाकडे प्रलंबित आहे. सध्या covid-19 मुळे शासनाने विकास कामांसाठी निधी रोखून घेतला होता, तो आगामी काळात सुरू झाल्यावर या पेक्षाही मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या भूमिपूजनाच्या धडाका सुरू करणार आहे. असे म्हणले

 

या भूमिपूजन सोहळ्यास शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश दादा पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन बापुसाहेब दिपक पाटील, माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण,अदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी वसावे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, प. स. सदस्य डॉ विजय चौधरी, दंगल सोनवणे, संरपच प्रभत ठाकरे, संरपच अविनाश मुसळदे,किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ किशोर पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, शहर अध्यक्ष विनोद जैन, जितेंद्र जमदाडे, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, अदिवासी मोर्चा सरचिटणीस सुखलाल रावताळे, संतोष राजपुत, विरसिंग पाडवी, संरपच जालमसिग दादा, गोविंद पटले, पोलीस पाटील मोग्या ,बळीराम दादा पाडवी, संरपच गोपी पावरा,विठ्ठलराव बागले, गुड्डू वळवी, हितेंद्र वर्मा ,सचिन पावरा,युवा नेते गोपाळ पावरा, संरपच दिलवरसिंग पावरा, दिनेश मराठे, काशीराम मोरे, संरपच तुळशीराम नाईक, टाईगर भाऊ, सहदेव पवार, प्रकाश वाघ, व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here