संत रविदासजी महाराज यांच्या समाजमंदिराचे भूमिपूजन

sant-ravidas-maharaj-mandir

असोदा, ता.जळगाव (प्रतिनिधी) – विजयादशमीच्या मुहुर्तावर चर्मकार समाज पंच कमिटी आयोजित श्री संत रविदासजी महाराज समाजमंदिराचे भूमिपूजन मोठ्या उस्साहात पार पडले.

 

या भूमिपूजन समारंभाला जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ देशमुख, असोदा वार्ड क्रमांक ५ चे ग्रामपंचायत सदस्य सुनिलभाऊ पाटील व चर्मकार समाज पंच कमिटी असोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजाच्यावतीने वरिष्ठ नागरिक काशीनाथ डोळसे, भागवत डोळसे, कांतीलाल वानखेडे, भास्कर भारुळे, सदाशिव वानखेडे, शंकर वानखेडे, मधुकर भारुळे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

 

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. उपस्थितांचे आभार चर्मकार युवा पंच कमिटीतर्फे सतीश डोळसे व अध्यक्ष गणेश वानखेडे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here