ऑनलाईन नोंदणीस सुरुवात; विजयादशमीच्या मुहूर्तावर संकेतस्थळाचे उद्घाटन संपन्न
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – खान्देशातील समाजबांधवांचा नामांकित व प्रतिष्ठीत कल्याण मंडळाचा वधूवर मेळावा ( मुंबई नाशिक व पुण्याच्या स्थळांसाठी प्रसिद्ध ) समाजबांधवांच्या आग्रहास्तव डिसेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दि. 25 ऑक्टोबर पासून ऑफलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी मंडळाच्या वेबसाईट चे ( http://khandeshmarathapatilmandalkalyan.in/ ) उदघाटन करण्यात आले. 5 ते 10 नोव्हेंबर 2020 पासून ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. खान्देशातील मराठा समाजाच्या कल्याण मधील मंडळाच्या कार्याची फलश्रुती वेबसाईटवर उपलब्ध आहे. आजच भेट द्या. http://khandeshmarathapatilmandalkalyan.in/
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मंडळाचाआजीव सभासद व त्यांच्या मुला मुलींसाठी नोंदणी फी 400 रूपये, आजीव सभासद नसलेल्या व त्यांच्या मुला मुलींसाठी नोंदणी फी 600 रूपये, वधूवरांचे E BOOK किंवा हार्ड काॅपी मोफत देण्यात येईल, मंडळ फक्त माहिती संकलन व प्रसिद्धीचे कार्य करते, वधूवरांच्या बायोडाटाची शहानिशा संबंधित दोन्ही पक्षकारांनी करून घ्यावी. बायोडाटाच्या माहितीसाठी मंडळ जबाबदार नाही. मेळाव्याची तारीख, नोंदणी, E book व इतर सर्व अधिकार मंडळ राखून ठेवत आहे आदी महत्वाच्या सूचना आहेत.
मेळाव्याकरिता नोंदणीसाठी बँक माहिती – KHANDESH MARATHA PATIL MANDAL KALYAN, ACCOUNT NUMBER : 379200100000290, IFSC CODE: SRCBO000379 Micr code: 400088114, Branch: SARASWAT BANK KHADAKPADA KALYAN WEST, PINCODE : 421301 अशी माहिती उपाध्यक्ष विजय भा.पाटील (शिरसमणी ता.पारोळा जि. जळगाव ह. मु.कल्याण )मो.9545158331 यांनी दिली आहे.







