वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न यवतमाळ जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या वतीने जि.प.शाळा मुडाणा, जिल्हा यवतमाळ शाळेतील कलाशिक्षक कै. अमोल गलबे सर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर पोहोचलेल्या आकस्मित संकटात त्यांचे सांत्वन व सहायता निधी रुपये ३००००/-देताना महामंडळाचे कोषाध्यक्ष नरेंद्र बारई, वि.उपाध्यक्ष दीपक गायकवाड, वि.सहकार्यवाह शेखर वानस्कर यवतमाळ जिल्हाचे अध्यक्ष निलेश तायडे, उमरखेड विधानसभेचे मा.आमदार राजेंद्र नजरधने, कला शिक्षक गोपाल ढवळे, गजानन मेहर, शाळेतील सहकारी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत श्रीमती गंगा अमोल गलबे यांना रोख रक्कम वितरित करण्यात आली.








