दुधखेडा धरणाचे पाणी पाटचारीमध्ये कॅनलव्दारे सोडले, 450 हेक्टर क्षेत्र ओलीता खाली – आमदार राजेश पाडवी

doodhkheda-dharan

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दुधखेडा येथे धरणाचे काम 1972 साली पुर्ण झाले असुन धरणाचा कालवा जिर्ण झाले. तरी मध्यंतरी कालवाचे काम करण्यात आले होते. तरीही कालव्याचा समस्या अनेक दुधखेडा गावातील शेतकरी व गावकरी यांनी श्रमदानातुन पाट स्वच्छ करुन कचरा काडुन पाटचारी खोल केला आणि शहादा धरणाचे कॅनल उघडुन पाटचारी सुरु केली 450 हेक्टर क्षेत्र ओलीता खाली येईल.

 

आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले की जिर्ण झालेल्या पाटचारी दुरुस्ती व देखबाली करीता लवकर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले तसेच शेतकरी राजा साठी आम्ही कटिबद्ध आहोत. कधीही फोन करा आपल्या समस्या असतील माझ्या पर्यंत पोहोचवा व्यात असे प्रतिपादन आमदार पाडवी यांनी केले doodhkheda-dam

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल भाऊ चव्हाण,दंगल सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, पंचायत समिती सदस्य डॉ विजय चौधरी, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, युवा उपाध्यक्ष दिलवरसिंग राजपुत, शेतकरी मेहरबान पावरा, मा संरपच सुनिल पवार, मोतेसिंग पवार, अमनसिंग पावरा, रमेश पवार, कुष्णा बिरारे, कालवा निरीक्षक अरुन निझरे, पाठकरी भरत भिल व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

 

rajesh-padavi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here