सारंगखेडा येथील आदिवासी मुलीचा गळा कापून खून करणाऱ्याचा शहादा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध

shahada-congress

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून शहादा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 

सारंगखेडा येथील वस्तीत राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा कापून नराधमांनी अमानुषपणे हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. हे निंदनीय कृत्य करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी तसेच रावेर तालुक्यातील चार आदिवासी अल्पवयीन मुलांचा खून करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व हे दोन्ही खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे जेणेकरून पिडीत कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल असे मत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश नाईक यांनी व्यक्त केले आहे. खानदेशातील या दोन्ही घटना अमानुष असून निंदनीय आहेत . भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे घडू नये व महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.shahda

 

यावेळी सुरेश नाईक शहादा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, श्रीमती भानुमती ईशी, सत्यन वळवी पं. स. सदस्य व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here