मुंबईत लोकल सुरु करण्यावरुन राजकारण?

local-train

मुंबई (हितेश मिस्त्री) – सर्वांसाठी उपनगरील लोकल सुरु करण्यावरुन मतभेद वाढल्यानंतर पुढच्या आठवडयात तणाव कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये बैठक होऊ शकते. गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकारला उपाय योजावे लागतील, त्याशिवाय २७.५ टक्के म्हणजे २२ लाख प्रवाशांनाच लोकलने प्रवास करता येईल, असं रेल्वेनं म्हटलं आहे. त्यावरुन हा नवीन वाद सुरु झालाय.

 

करोना व्हायरस आणि लॉकडाऊन आधी दररोज ८० लाख प्रवासी उपनगरीय लोकलमधून प्रवास करायचे. करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियम पाळणे आवश्यक असल्याने रेल्वेने प्रवासी संख्येवर मर्यादा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्याआधी रेल्वेला पाठवलेले पत्र लीक झाल्याबद्दल राज्य सरकारने नाराजी प्रगट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here