चोपडा (रविंद्र पाटील) – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहू देणार नाही तो धरणगाव येथे मोजण्या संदर्भात मी जिल्हा निबंधक यांचेशी बोललो व आता जिल्हाधिकारी यांचे शी देखील बोलून तसा आदेश करायला सांगतो. या संदर्भात माझे श्री अरूनभाई गुजराथी यांचेशी देखील बोलने झाले त्यांना देखील मी शब्द दिला आहे,या बाबतीत आ.डॉ सुधीर जी तांबे यांनी देखील फोन करून पाठिंबा दिला.
यावेळी चोपडा तालुक्यातील च नव्हे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी धरणगाव येथे कापूस मोजत आहेत तो कापूस फेडरेशन घेत आहे ,त्यांना तालुका बंदी लागू नाही ,सी सी आय चे ना हरकत लागत नाही .मात्र सहकार विभागाचे डी डी आर च्या आदेशाने तहसीलदारांनी पंचनामा केलेला कापूस कायद्याने फेडरेशन ला घेता येत नाही असे सांगितले जाते तर असा कोणता कायदा आहे ?या बाबत चौकशी होऊन जिल्ह्यातील साऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे एस बी पाटील यांनी मंत्री महोदय यांना सांगितले.
आपण आजचे उपोषण थांबवावे अशी विनंती मा मंत्री महोदयांनी एस बी पाटील यांना केल्याने आजचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
अधिकारी कापूस घ्यायला तयार सरकार पैसे द्यायला तयार मात्र कापूस फेडरेशन चा विरोध हा न समजण्याच्या पलिकडचा आहे.त्यांना अजूनही विनंती शेतकऱ्यांची पोर आहात शेतकऱ्यांची हाय घेऊ नका.त्यांनी त्यांचा हेका न सोडल्यास जिल्ह्यातील साऱ्या शेतकऱ्यांना घेऊन कापूस फेडरेशन च्या कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढू असा इशारा देखील एस बी पाटील यांनी दिला.
यावेळी तहसीलदार श्री अनिल गावीत,तालुका सहकार निबंधक श्री के पी पाटील,बाजार समितीचे सभापती श्री नारायण पाटील,श्री रावसाहेब पाटील,संतोष पाटील,प्रकाश पाटील,कुलदीप पाटील,चंद्रकांत पाटील हजर होते.
Home Uncategorized चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहू देणार नाही – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील







