एकतर्फी प्रेमातून तरुणाने १७ वर्षीय मुलीचा भररस्त्यात गळा चिरला

one-side-love

विशाखापट्टणम – एकतर्फी प्रेमातून वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने १७ वर्षीय मुलीचा भररस्त्यात गळा चिरला. विशाखापट्टणममध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही १२ वीत शिकत होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

अखिल असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो वकिलीचे शिक्षण घेत आहे. गजुवका परिसरातील एका मंदिराजवळ त्याने तिला बोलावून घेतले. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणाने तिचा गळा चिरला. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

या घटनेनंतर आरोपी पसार झाला. शनिवारी रात्री या आरोपीला अटक केली. अखिलला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य एका तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here