४ हजारांची लाच स्वीकारतांना वैद्यकिय अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

nandurbar-acb

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – उपचाराच्या फाईलमधील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी ४ हजारांची लाच स्विकारतांना लोकसेवक एस.टी.महामंडळचे वैद्यकीय अधिकारी(कंत्राटी) लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्या विरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार एस.टी.महामंडळ चालक वय 55 वर्ष रा.नंदुरबार यांना हृदयाविकारच आजार असून त्यांना यापूर्वी अटॅक आलेला आहे.त्यांची अंजिओग्राफी व अंजिओप्लास्टी झालेली आहे त्यां उपचाराचा एकूण 3 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे.ते बिल एस.टी. महामंडळाकडून मंजूर होण्याकरीता फाइल तयार करून नंदुरबार एस टी महामंडळाद्वारे नियुक्त केलेले गाझीनगर नंदुरबार येथे दवाखाना असलेले डॉक्टर मोजम अली खान यांच्याकडे मे 2020 मध्ये पडताळणीसाठी फाइल सादर केली.त्यानंतर ती फाइल विभागीय कार्यालय धुळे येथे पाठवल्यावर तेथून त्रुटी वर ती परत आली त्या त्रुटींची पूर्तता करून फाइल इतर लोकसेवक डॉक्टर खान यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात तक्रारदार यांनी दिली.nandurbar-crime

 

लाच दिल्याशिवाय ते फाइल ची पूर्तता करत नव्हते त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग नंदुरबार कार्यालयात तक्रार दिली.त्या तक्रारी वरुन दि 29 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभाग नंदुरबार यांनी पडताळणी केली असता लोकसेवक खान यांनी पंचासमक्ष 4000 रुपय लाचेची मागणी करून ती लाच दिनांक 2 नोव्हेंबर रोजी त्याच्यां गाझीनगर येथील दवाखान्यात पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

विभागातील सापळा पथकात शिरिष टी जाधव पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.नंदूरबार युनिट,सापळा अधिकारी जयपाल अहिररराव,पोलीस निरीक्षक ला.प्र.वि नंदूरबार यांच्या सह HC/ उत्तम महाजन,संजय गुमाणे, मनोहर बोरसे PN, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे,WPN ज्योती पाटील आदींनी सदर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here