धुळे (विशेष प्रतिनिधी) – सांडपाण्यावरुन वाद झाल्यानंतर तो मिटवण्यासाठी गेलेल्या भावावर लहान सख्या भावाने चाकुने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली असून यात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.
वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचा सख्ख्या भावानेच चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील मुकटी गावात घडली आहे. नातेवाईकांमध्ये सांडपाण्यावरुन वाद झाल्यानंतर तो मिटविण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने वार केल्याने त्याची हत्या झाली आहे. यात धनराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत.धनराज पाटील यांच्या लहान भावाचा शेजारील नातेवाईकांशी सांडपाण्यावरून वाद झाला होता.
दरम्यान यावेळी विकोपाला जाणारा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवरच दादा पाटील याने चाकूने हल्ला केला. यात धनराज पाटील यांच्या छातीत चाकू भोसकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना संशयित दादा दौलत पाटील याला अटक करण्यात आले आहे.







