भरदिवसा घरफोडी शिरगावातील घटना, साडेनऊ तोळे सोन्यासह 23000 रुपये चोरले

gharphodi

अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना काल घडली. साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने व 23000 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत खाजगी नोकरीस असलेले अभियंता अमोल वसंत होले (वय 28) रा. शिरसगाव , ता.नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 चे सुमारास मी, आई, वडील व पत्नी असे आमच्या मामाचे वर्षश्राद्ध असल्याने कांगुणी (ता. नेवासा) येथे गेलो होतो. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आमच्या घरी शिरसगाव येथे परत आल्यानंतर मी माझेकडील चावीने घराचा दरवाजा उघडला व घरामध्ये पाहिले असता मला घरातील मधला दरवाजा तसेच आमच्या घरामागील दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर मी बेडरूम मध्ये गेलो असता तिथेही घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कुणीतरी तोडून घरात घुसून 23 हजार रुपयांची रोख रक्कम (500 रुपयाच्या 46 नोटा) साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने( राणीहार, नेकलेस, गंठण, अंगठी व लहान बाळाचे दागिने आदी) या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here