उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय पत्रकार संघाने केला सत्कार
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांना केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व तसेच केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी कमलेश गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दस्तगीर पठाण केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हा कोषाध्यक्ष तोहीद मुल्ला केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हा संघटक संग्राम पाटील व सांगली जिल्हा सहसंघटक अक्षय सुतार सांगली जिल्हा सचिव अविनाश मासाळ कॅमेरामॅन सागर मस्कर आदी उपस्थित होते.







