पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – देवयानी शिवाजी ननवरे वय वर्ष आठ वर्ष हिने इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कल्चरल डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे 2018साली तसेच 2019 चाली बँकॉक येथे झालेल्या कल्चरल डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे सध्या ती एंजल हायस्कूल येथे ही CBSC मध्ये तिसऱ्या वर्गात शिकत आहे.
नृत्यमल्हार या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये तिला वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक सांघिक मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे, तसेच तिला मॉडेलिंग ची ही आवड असून ती मिस्सी पुणे प्राईड या लहान मुलांच्या मॉडेलिंगच्या शोमध्ये विनर आहे,तसेच रायझिंग स्टार पुणे या लहान मुलांच्या मॉडेललिंग शो मध्ये प्रथम रनरअप आहे लहान वयात केलेल्या कामगिरीमुळे अखिल भारतीय साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था यांनी तिची बाल कलाकार म्हणून निवड करून तिला पुरस्काराने सन्मानित केले आहे







